'आनंद'

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३

पानोपानी वाहत वारा
कानी हलके रुणझुणणारा,
सारे काही निवांत शांत
नाही चिंता नाही भ्रांत

एकांती एकांत सुखावणारा
निर्झर निळा दुडदुडणारा
नीर पैंजणे छुमछुमणारा,

आनंद तुषार आनंद लहरी
आनंद सार आनंद प्रहरी
आनंद नर्तने गुंगविणारा
मेघगर्जना गडगडणारा
श्रावणलडीतून रिमझिमणारा,

आत आत झिरपत झिरपत
भरून उरला अंतरंगात
ओलावा असा हा खोल रुजणारा.

- अर्चना रानडे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा