ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
हिमालयातील आत्युच्य शिखर सर करण एक वेळ सोप आहे , परंतु नियतीने माणसापुढे उभी केलेली काही वैयक्तिक आव्हाने पेलणे खूपच अवघड असते . परंतु धैर्याने आणि सातत्याने प्रयन्त केल्यास अशी आव्हाने पेलता येतात याच जीवंत उदाहरण घालून दिले आहे इचलकरंजीचे श्री प्रकाश दाते आणि सौ शारदा दाते यांनी त्यांचा मुलगा प्रथमेश हा जन्मापासून मतिमंद (Down Syndrome) त्याने आज विक्रम प्रस्थापित केला आहे केवळ शिक्षण फक्त इयत्ता 9 वी पर्यन्त होऊन देखील भारतातील सर्वात मोठ्या टेक्साटाईल व इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ग्रंथपाल सहायक म्हणून गेल्या अकरा (11) वर्षापासून काम करीत आहे.
प्रथमेशच्या जन्मापासून सतत गेली अठरा वर्षे त्यांच्या आई वडिलांनी त्याला सर्वसामान्य जीवन मिळवून देण्याकरिता प्रयन्नाची पराकाष्ठा केली त्यांनी नियतीचा कौल स्वीकारला व अथक धडपडीतून दगडातून देव घडविला . त्याला Down Syndrome या आजारचे निदान झाल्यापासून फक्त वैद्यकीय ज्ञानावर जिद्दीने प्रयत्नांचा पर्वत उभा केला . प्रचंड कष्ट घेतले स्वत:ची तहान भूक गहाण ठेवून केवळ प्रथमेश हा केंद्र बिन्दु मानून अनेक वैदकीय उपचार केले . व त्यानेही या सार्या प्रयन्त्नाला खूप साथ दिली आणि या सार्या परिश्रमाचे हे चीज झाले.आज हा मुलगा INTERNATIONAL CELEBRITY झाला आहे . देवाने हे दु:ख आमच्याच का वाट्याला दिले असा सूरही कधी आळवला नाही आणि त्याची फलश्रुति म्हणजे हा हिमतीने उभा केलेला हा प्रथमेश.
प्रथमेशच्या कार्य-कर्तृत्वावर मराठी , हिन्दी , कोकणी , कन्नड वैगेरे अशा दहा भाषेच्या दैनिकातून त्याच्यावर 80 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत तसेच वयाच्या 22 वर्षी त्याने NATIONAL AWARD DELHI तसेच पाठोपाठ सलग दुसर्या वर्षी राष्ट्रपति पुरस्कार मिळवला . सलग दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा Down Syndrome असलेला मुलगा देशभर प्रसिद्ध पावला. इ.स.2012 साली INTERNATIONAL DOWN SYNDROME (LONDON) अवॉर्ड त्याने मिळवले अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हा पहिला भारतीय आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्याचा गौरवपूर्ण सत्कार केला आहे.
इ.स.2015 मध्ये चेन्नईत भरलेल्या INTERNATIONAL DOWN SYNDROMES या परिषदेमध्ये भारतीय वक्ता म्हणून या एकट्या प्रथमेशचीच निवड झाली जगातील 25 देशांच्या 400 प्रतिनिधींसमोर प्रथमेशने संवाद साधला. या परिषदेमध्ये दीप प्रज्वलनातही भाग घेतला इतकेच नव्हे तर त्याने मोठ्या दिमाखात आपल्या भारताचा तिरंगा मिरवत नेला. दाते कुटुंबियांच्या कित्येक वर्षाच्या कठोर परिश्रमाचे हे प्रगतीकरण होते आणि यासाठी करावे लागलेले कठोर प्रयत्न आणि सहन कराव्या लागणार्या यम-यातना त्यांनाच माहीत..
असा हा मतिमंद प्रथमेश इतक्यावर थांबला नाही तर त्याची किर्ति जगभर पसरली व जेट एयरवेज या नामांकित विमान कंपनीने त्यांच्या जेट विंग या मासिकात प्रथमेशवर फार मोठे आर्टिकल कव्हर केले आणि या मुलाला जगाच्या नकाशावर उभे केले त्यामुळेच AUSTRALIA AND BHARAT यांच्या संयुक्त विद्यमातून DOCUMENTARY FILM बनविण्यात आली या फिल्म साठी प्रथमेशची भारतातून निवड झाली या फिल्मला BOLLYWOOD AND HOLLYWOOD या फिल्म फेस्टीवल मध्ये पहिला क्रमांक मिळाला.
अशा या प्रथमेशला उभे करताना त्यांनी जे कष्ट घेतले प्रयत्न केले ते सर्वासमोर यावेत यासाठी हे कुटुंब प्रयत्नशील रहात आले आहे मुलाच्या चिंतेत असतात या सर्वांना प्रेरणा मिळावी व योग्य प्रयत्न केल्यास निश्चितपणे मतिमंद मूल सामान्य होऊ शकते हे निश्चितच मोठे उदाहरण आहे ज्यांना कोणाकडे अशी समस्या आहे अशा पालकांनी खालील ई-मेल वर त्यांच्याशी जरूर संपर्क करावा आज जगासमोर हे एक ज्वलंत उदाहरण आहे.
- सौ. शारदा प्रकाश दाते
ksatish37@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा