सुख


कण आले रे सुखाचे, साठव साठव
क्षण भेटता दुःखाचे,ते आठव आठव

रोजच्या वाटेवरी फुले कितीक फुलली
थोडी खुडली खुडली, गेली भरून गे झोळी

इंद्रधनुने नभी उधळिले सप्तरंग
पाचूजडल्या पिसा-याचा आगळाच ढंग

मोकळा श्वास मंदिरातील गळून पडती बंध
मंदिराच्या गाभा-यातील तो मांगल्याचा गंध

बालकाच्या मुखावरले हास्य निरागस
गालांचे फुगे नि डोळ्यातील पाडसं

देवाजीने केली किती मुक्तहस्ते उधळण
सुख शोधायचे म्हणता ते आहे का कठीण?

अर्चना रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा