नैराश्य



आज परत बाॅस खेकसला
माझा राग अनावर झाला
पण टेबलावर फॅमेली फोटो पाहिला
तसा नैराश्येने जीव गहिवरला

पॅंट्रीत गेलो घोटभर चहाला
ऑफिसबाॅय हसला, म्हणाला,
साहेब, चेहरा माझ्या आबागत् पडलाय
ह्यावर्षी पाऊस उभ्या पिकावर गडगडलाय!

चहानंतर सिगारेटीचा विसावा आठवला
पानपट्टीवर जुना मित्र भेटला,
त्याचेही पैसे दिले, तसा “थॅंक्स” म्हणाला,
“साला, आपला आज जाॅबच गेला!”

माझी मलाच लाज वाटली
कशी का असो, नोकरी शाबुत आहे आपली
फोटोत लावायला एक सुंदर आहे फॅमेली
मग का बरं नैराश्येची धाड होती भरली?!


- केशव पाटणकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा