निरोगी मन, निरोगी शरीर


हल्ली जसा सगळ्यांचा असतो, तसा आमचा पण एक Family whats app group आहे. त्यात सगळ्यांचे वाढदिवस साजरे होतात. मग निरनिराळ्या प्रकारे wish केले जाते. अगदी साध्या Happy Birthday पासून have a wonderful day वगैरे वगैरे. माझ्या एका नातेवाइकानी wish केले होते, स्वस्थ रहे, मस्त रहे. पण माझ्या मनात आले की, मस्त रहे, स्वस्थ रहे, जास्ती बरोबर वाटेल का? कारण बरेचसे आजार हे मनातून शरीरात शिरकाव करतात. माणसाचे मन आणि माणूस कसा विचार करतो, हे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही जर हसतमुख, बोलके, स्वभावानी मोकळे, सकारात्मक विचार करणारे असाल तर आयुष्य खूप सोपे आणि आनंदी होऊ शकते. लहान लहान गोष्टींचा बाऊ करू नये. “अमका मला असे म्हणला”, “तमकी माझ्याशी अशी वागली”. ह्या गोष्टींना फार महत्व देऊ नये. आणि असे झालेच तर, आपलेही वागायला काही चुकले का हे नक्की तपासून बघावे. दुसर्‍यांमधे दोष काढणे नेहमीच सोपे असते, पण मी एक माणूस आहे आणि मी पण चुकू शकते हा विचार जरी केला तरी बरेच गुंते सुटू शकतात. आपली चूक वाटली तर दुसर्‍याला पटकन सॉरी म्हणले पाहिजे. आणि दुसर्‍याचे दिलखुलास कौतुक करणे सुद्धा आपल्या मनाला खूप आनंद देते. सर्वात महत्वाचे म्हणजे जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. Forget the past, Enjoy the Present & Be Positive about the Future. हा दृष्टिकोन ठेवला तर आयुष्य सुटसुटीत होईल. दुसरे म्हणजे मनात कुढत बसणे हे सुद्धा तब्येती करता अजिबात चांगले नाही. जे मनात आहे ते बोलून दाखवावे नाही तर विसरण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्याला एक आयुष्य मिळते. ते कसे घालवायचे हे पूर्णपणे आपल्या हातात असते.

पाश्चात्य देशांमध्ये आढळणारा नैराश्य किंवा डिप्रेशन हा मानसिक आजार, आता भारतातही त्याची बरीच चर्चा होऊ लागली आहे. मध्यंतरी प्रसिद्ध Bollywood अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या डिप्रेशन विषयी मुलाखती दिल्या, व मोकळेपणानी त्याबद्दल चर्चा केली. अशा आजारा वर उपचार करून पुर्णपणे बरे वाटू शकते असेही तिने सांगितले. Celebrities जेव्हा ह्या गोष्टींबद्दल बोलतात, त्याचा फायदा तरूण पिढीला होऊ शकतो. पूर्वी हा आजार आपल्याकडे नव्हता असे म्हणणे योग्य होणार नाही. पण त्याची चर्चा होत नव्हती हे मात्र नक्की. कारण मानसिक आजाराकडे आजार म्हणून पाहीले जात नव्हते. किंवा हा आजार आहे, हे ओळखून Psychiatrist कडे जाणे लोक टाळत असत. समाजामध्ये त्याची चर्चा होईल अशी काळजी प्रत्येकाला वाटत असे. माणूस तसाही बिचारा लोकं काय म्हणतील? ह्या दडपणाखाली जगत असतो. आत्ताही परिस्थिती खूप बदलली आहे, असे नाही. पण हळूहळू प्रगति होतीये.

आत्तापेक्षा पूर्वी एकटेपणाचे प्रमाण नक्कीच कमी होते. तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात भरपूर लोक असायचे, लहान मुलांना कधीही एकटे राहण्याचा, भीती वाटण्याचा प्रसंग येत नसे. Sharing आणि caring मुलांना शिकवण्याची गरज नव्हती. तर तो जीवनाचा आपसूकच एक भाग होता. तेव्हा इंटरनेट नावच्या राक्षसाने आपल्या आयुष्यात पदार्पण केले नव्हते. त्यामुळे एकत्र बसून गप्पा मारणे हे घरोघरी होत असे. कुटुंबा मधे, मित्र मंडळी बरोबर उत्तम संवाद असेल, तर मन निरोगी राहू शकते. तेव्हा संपन्नता आणि साधने कमी असली तरी, आयुष्य तणाव रहित, आनंदी, उत्साही होते. आता प्रत्येकाला फेसबूक व व्हाट्स app वर ढीगानी मित्र, मैत्रिणी दिसतात. पण खरच काही अडचण आली, आणि मनातले कोणाशी बोलावेसे वाटले तर त्यातल्या किती जणांशी आपण मनमोकळे बोलू शकतो, संवाद साधू शकतो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. फेसबूक, instagram वर जगभर फिरल्याचे, समारंभाचे, फोटो टाकण्याची जीवघेणी प्रतिस्पर्धा चालू आहे. आणि मग त्याला किती likes मिळाले ह्यावर लक्ष ठेवणे. आता इंटरनेटचा आपल्या आयुष्यावर इतका पगडा आहे, की हे सर्व करायला हरकत नाही. पण जेव्हा ह्या सगळ्याचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम व्हायला लागतो, तेव्हा ते धोक्याचे आहे. तरुण मुला, मुलींना तर ह्या सर्व प्रकाराचा खूप त्रास होतो. Cyber bullying, body shaming ह्या बद्दल रोज ऐकायला मिळते. हल्ली बहुतेक घरांमध्ये आई, बाबा व एक मूल अशी परिस्थिती आहे. ज्या वयात मोकळ्या वातावरणात बाहेर खेळले पाहीजे, तेव्हा मुले आपल्या बंद खोलीत computer वर बसतात. हे बघून वाईट वाटते. दुसर्‍यांशी प्रत्यक्षात संवाद साधणे हे तरुण मुलांना अवघड जाते, कारण त्याची जागा online chatting नी घेतली आहे. अशी मुले virtual जगात वावरत असतात. आपण ज्याच्याशी बोलतोय, त्या माणसाची identity सुद्धा बरेचदा खोटी असू शकते. उदा : फेसबूक फ्रेंड्स. सध्या शाळा, कॉलेज मधे counsellors असतात त्याची सुद्धा मदत होऊ शकते.

पण पालक म्हणून सगळ्यात पहिले म्हणजे मुलांशी भरपूर गप्पा मारल्या पाहीजेत. त्यांच्या मित्र, मैत्रिणींना घरी बोलावणे. मित्र, मैत्रिणींच्या पालकांशी ओळख ठेवणे. हे सगळे गरजेचे आहे. घरात वातावरण मोकळे असावे. म्हणजे मुलाला काहीही प्रॉब्लेम आला तर ते मूल येऊन आपल्याशी मोकळेपणी बोलेल. आधीच त्यांना अभ्यास, करियर ह्याचे खूप दडपण असते, ते कसे कमी करता येईल हे पहावे. निदान रात्रीचे जेवण सगळ्यांनी एकत्र घ्यावे. जेवताना मुलांना रागावणे, सिरियस चर्चा करणे हे टाळावे. मूल अभ्यासात खूप चांगले नसेल तर काही हरकत नाही. सध्या करियर करता इतकी क्षेत्र आहेत. की, ज्याची आवड आहे, असे करियर मुले निवडू शकतात. पालक आणि घर हे मुलाकरता सगळ्यात महत्वाचे असते. तिथे त्यांना पक्का आधार मिळाला नाही. आपला problem सांगता आला नाही, तर काय करावे त्यांना सुचत नाही, व दडपण येऊ शकते. प्रत्येक आई, बाबांचे, व घरातील इतर मंडळींचे पहिले कर्तव्य मुलाकडे लक्ष देणे आहे. असे मला वाटते. मुलाच्या वर्तना मध्ये काही बदल वाटल्यास लगेच मुलाशी संवाद साधावा. कारण बाहेरच्या परिस्थिती बद्दल आपण फार काही करू शकत नाही, पण त्या सगळ्या प्रेशर ला तोंड द्यायला आपण आपल्या मुलाला नक्की तयार करू शकतो. आणि त्याचा भक्कम आधार बनू शकतो. एकदा तुमचे व्यक्तिमत्व पक्के, confident बनले की, नैराश्य, depression ह्याची भीती राहणार नाही, आणि जे सुंदर आयुष्य मिळाले आहे ते आपण पूर्णपणे एंजॉय करू शकतो.


मेघना असेरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा