नवोदय

ऋतुगंध वर्षा  वर्ष १३ अंक ३
सतत केला जातोय
गैरवापर जातीयतेचा
अजाणतेपणी विसरलेल्या
पुरातन संस्कृतीचा
टोणे टोणपे येऊन
गेले सांगून आपणाला
तोड मरोड करुन
दिला इतिहास अभ्यासाला
आंधळ्या डोळ्यांचा
वापर केला सर्वांनी
उमजत असूनही
मौनात समाधानी
मग अचानक
विशालकाय शक्तिचा
उगम झाला धरित्रीवर
हिंदुत्वाच्या अवजारांनी
केले त्याने पदार्पण
छाटून जाऊ देत
ते अधम भ्रष्ट विचार
होऊ दे कत्तल
बुजलेल्या, कुजलेल्या
भ्रष्ट आचारांची
अन् झळकू दे गगनी
पताका ही माणूसकीच्या
हिंदूत्वाची !

-नंदिनी नागपूरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा