संपादकीय - ऋतुगंध ग्रीष्म


सर्वप्रथम ऋतुगंधच्या समितीतर्फे तुम्हाला हार्दिक अभिवादन! गेल्या अनेक वर्षीच्या सुसंस्कृत आणि दर्जेदार अंकांच्या परंपरेला साजेसे रंजक आणि अर्थपूर्ण अनुभव देणारे अंक घेऊन येण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. त्यातला दुसरा अंक - ऋतुगंध ग्रीष्म आपल्यासमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. 

ह्यावर्षीचे आपले ऋतुगंध चे अंक मानवी मनाच्या भाव भावना ह्या संकल्पनेवर आधारित आहेत, सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी निसर्गतःच काही प्रवृत्ती आहेत त्यातील "भय" ही देखील एक उपजत प्रवृत्ती. ह्यावरच आधारित साहित्य पाठविण्याच्या आमच्या आवाहनाला आपण भरभरून प्रतिसाद ह्या ही वेळी दिला आहे. 

एकंदरीतच 'डर जरुरी है ' असा सूर बऱ्याच लेखात आहे. 'ट्रेकिंग पहावे करून' ह्या विवेक वैद्य यांच्या लेखमालेतील "सैतानछाया" हा लेख वाचताना मराठीतील कोणत्या प्रसिद्ध लेखकाच्या लेखनाची आठवण होते आहे बघा आणि आम्हाला जरुर सांगा. श्रीकांत जोशी यांच्या ' मना सज्जना ' या लेखमालेत भय/ भीती ही भावना किती पुरातन आणि नैसर्गिक आहे हे समजते. नितीन मोरे हे भाषा तज्ञ त्यांचे लेख वाचताना आपल्या शब्द संग्रहात नेहमीच नवी भर पडते. त्यांच्या लेखाचं नाव ' पलगा ' हा असाच एक शब्द. 

सुवर्णा कुलकर्णी यांची पुदिना भाताची पाक कृती करून पहावी अशीच.

यंदा प्रत्येक ऋतुमध्ये साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्रातील महत्वाच्या सण उत्सवांवर आधारित ऋतुगंध चे मुखपृष्ठ आपणास नक्कीच आवडेल. 

प्रत्येकअंकात आपल्या भेटीस येणाऱ्या सहा लेखामालांबरोबर ललित, कथा, कविता पाककृती असं सर्व प्रकारच साहित्य आपल्यापुढे सादर करीत आहोत. शिवाय बालमित्रांनी काढलेली सुंदर चित्र आहेतच. 

तर मंडळी, ब्लॉग स्वरुपात अंक असल्यामुळे वाचल्यावर लगेच प्रतिक्रिया द्यायला विसरु नका. 

- राजश्री लेले


1 टिप्पणी: