ऋतुगंध हेमंत - वर्ष १२ अंक ५
भारतमातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार होता. एकाएक क्रांतीकारक म्हणजे एकाएक रत्न! प्रत्येक क्रांतीकारकाला फाशी दिली गेले आणि तिच्या हारातील एक एक रत्न निखळून पडले.हे दुःख भारतमातेच्या मनात अजूनही सलते आहे. असे कितीतरी अज्ञात, अनाम वीर असतील ज्यांनी भारतमातेसाठी प्राणाहुती दिल्या आहेत. आज त्यांची नावेही इतिहासाला माहित नाहीत. त्या सर्व सुपुत्रांना हे काव्यरूपी वंदन आणि श्रद्धांजली!
क्रांतीची घेऊनी मशाल हाती
निघाला मम सुपुत्रांचा मेळा
परवशतेचा पाश तोडण्या
कोणी न मागे सरला
स्वमातेच्या मुक्तीसाठी
कवेत घेतले मृत्यूला
अन् माझ्या कंठमाळेतील
एकएक मणी ओघळला ||१||
भिल्ल रामोशी घेऊन हाती
उभारिले सेनेला
अन् शत्रूच्या छाताडावर
एकाकी जाऊन धडके
वासुदेव बळवंत फड़के
तो वीर बाळ माझा
एकाकी गाठून मारिले त्याला
एकएक मणी ओघळला ||२||
नाही साहिले अत्याचारा
जेरीस आणला साहेब गोरा
रॅंड आयर्स्टला देऊन दणका
क्रांतीचा वाजवला डंका
फाशी गेले चापेकरबंधू अन् रानडे
देऊन मजसी दुःख एवढे
नाही भ्याले ते मरणाला
एकएक मणी ओघळला ||३||
शूरवीर तो मदनलाल धिंग्रा
अनंत कान्हेरे तो बाळ कोवळा
लावून गेला मजला लळा
उधमसिंग अन् विष्णु गणेश पिंगळे
सोडून गेले मजला सगळे
भगतसिंग सुखदेव राजगुरु तो
चंद्रशेखर आझादही गेला
एकएक मणी ओघळला ||४||
खुदीराम अन् सुभाषचंद्र
बोसकुळाचे कुलभूषण
आणण्या शत्रूला शरण
आझाद हिंद केली स्थापन
तो गुणी बाळ माझा
म्हणती अपघाती गेला
मुळी न वाटे साचे मजला
एकएक मणी ओघळला ||५||
या सर्वांचा प्रेरक नायक
बुद्धिमान तो वीर विनायक
अंदमानी भोगूनी सजा
आदर्श झाला सर्व समाजा
प्रिय तो माझा सावरकर
मम कंठमाळेचा कोहिनूर
मृत्यूही त्यापुढे ओशाळला
एकएक मणी ओघळला ||६||
करूनी माझे दोन तुकडे
म्हणोत बापडे कोणी वेंडेट्टा
रक्ताविना स्वातंत्र्य मिळविले
अन् रक्ताचे ते पाट वाहिले
मनीच्या वेदना मलाच ठाऊक
ढाळते अजूनी अश्रूला
एकएक मणी ओघळला ||७||
-निर्मला नगरकर
kavita chhan ! Aaplya kavya-kalpanes vandan !
उत्तर द्याहटवा