“बस्स एवढंच......”

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २
काळोखाची भीती
म्हणून लावल्या वाती
त्यांना रक्ताचं तेल
ते किती दिवस पुरेल?

म्हणून डोळेच काढून जाळले.
आता मी आंधळा.
काळोखाचा राजा.....
तुझी सोबत गृहित धरली आहे.
बस्स एवढंच.

- निरंजन भाटे

२ टिप्पण्या:

  1. कुणाची सोबत गृहित धरून असे डोळे काढून द्यायचे असतात होय...

    उत्तर द्याहटवा
  2. अल्पाक्षरी आणि परिणामकारक.. हा प्रकार छान हाताळला आहे.
    जाळले ज्यांनी डोळे त्यांना सोबतीची का तमा?
    मीच माझा सोबती हा विश्वास जागे नवा!

    उत्तर द्याहटवा