ऋतुगंध हेमंत - वर्ष १२ अंक ४
निळी शाल त्याची, पांघरलीस तू
प्रीतीत तयाच्या, आकंठ बुडालीस तू
नावातच त्याच्या, ओळख सांगितलीस तू
राधिके, मला विसरलीस तू
खिजगणतीतही नुरलो मी तुझ्या
भरुन राहिलीस ह्रदयात माझ्या
तुझ्या कृष्णछटांसह स्वीकारले मी
माझ्या सावलीतही व्यापून राहिलीस तू
- नीला कुंटे
ही कविता राधेचा पती 'अनय' याचे मनोगत आहे.
उत्तर द्याहटवा