ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
अंगाला स्पर्शत
गवताचे पात म्हणाले
मी नाही... वारा आहे
केसांना विस्कटवत
वारा म्हणाला
मी नाही...
बूचतरु ओघळत आहे
श्वासांशी सलगी करत
कळ्या म्हणाल्या
आम्ही नाही...
सोनचाफा उमलला आहे
पाण्यात प्रतिबिंब पाहू जाता
कमळ अलवार डहुळले
चेहरा लपवत म्हणाले
मी नाही.. तूच तर आहे !!!!
यशवंत काकड
खूपच सुंदर!
उत्तर द्याहटवाधन्यवाद योगेश. मी इथले प्रतिसाद आज वाचत आहे.
हटवा