वनवास

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १


आकाशाकडे बघून वाळवंट म्हणाले
कुठला वनवास भोगत आहे मी?
ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 
दूरदूरपर्यंत माझ्याशिवाय मला 
अजून कुणीच दिसत नाही! 

माझ्या जगण्याला राम उरला नाही!!!
आकाश म्हणाले, तुला फुलवण्याच्या 
ज्यानी प्रयत्न केला त्या निवडुंगाला विचार?
एखाद्या दलदलीत फसले असते त्याचे आयुष्य
तूच तर दिला त्याच्या जगण्याला राम!!!!

रात्रीच्या कभिन्न काळोखात 
तू चांदण्यांचं वैभव उपभोगत असतोस,
तुझ्या अंगावर वारा नक्षी उमटवत असतो,
उंटाच जहाज तुझ्या मृगजळावरून 
शेकडो मैल दूर प्रवास करत पोहोचतं,
उगवतीचा.. मावळतीचा सूर्यास्त होताना
तुझी काया नव्या नवरीसारखी चमचम करत असते
आणि तू म्हणतोस कुठला वनवास भोगत आहे मी?

- यशवंत काकड



1 टिप्पणी: