ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
आनंदाची अनुभूती देणारी काही मोजकी गाणी
आनंदी आनंद गडे - ज्या लोकांचे प्रार्थमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे त्यांनी ही बालकवींची कविता शाळेत नक्की वाचली असेल. निसर्गात सर्वत्र भरलेला आनंद शब्दात मांडणारे शब्दप्रभू होते बालकवी उपाख्य त्रिंबक बापूजी ठोंबरे. या कवितेला चाल दिली आहे ती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि स्वर दिला आहे तो लतादीदी यांनी.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे
रामजन्माचे वर्णन - गीतरामायण ही अजरामर कलाकृती पुणे आकाशवाणीवरून १९५५ सालातील रामनवमी ते १९५६ सालातील रामनवमी या कालखंडात सादर केली गेली. अतिशय परिणामकारक काव्य आणि त्याला पूरक असे संगीत. यातील प्रत्येक गीत ऐकताना प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अशी कलाकृती. त्यातील रामजन्माचं काव्य आणि गीत तर अतिसुंदर आहे अनेक वेळा ऐकूनही समाधान होत नाही.
राम जन्माला ग सखी
चांदणे शिंपीत जाशी - कवी राजा बढे यांच्या काव्याला स्वरसाज चढविला आहे तो पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आशाताईंचा स्वर एका वेगळ्या आनंदाची अनुभूती देतो.
चांदणे शिंपीत जाती
सीतास्वयंवराचे वर्णन - पी सावळाराम उपाख्य निवृत्ती रावजी पाटील हे शब्दप्रभू होते. त्यांच्या काव्याला चाल दिली आहे ती वसंत प्रभू यांनी आणि स्वर दिला आहे लतादीदीनी. काव्य आणि चाल इतकी दर्जेदार आहे की सीता स्वयंवराचा प्रसंग आपल्या डोळ्यापुढे उभा राहावा.
लाजली सीता स्वयंवराला
लाजली सीता स्वयंवराचा हे गीत रमेश अणावकर यांनी लिहीले आहे.असा उल्लेख आहे.
उत्तर द्याहटवा