ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १
ती आज येता
अचानक समोर
आठवणींचे मोर
मग नाचू लागती
डोळ्या समोर !
ओळख पटण्या
झाला थोडा उशीर
पंधरा वर्षाचा काळ
नजरे समोरून
गेला मग झरझर !
होती ती तशीच
पडला नव्हता
फारसा फरक फार
केसात सोडली जर
एखादी चंदेरी तार !
कसा आहेस ?
ऐकताच मंद स्वर
आलो भानावर
फुटेना एक शब्द
बोलण्या पडे विसर !
मुक्याने तसाच गेलो
निघून समोरूनी
दाखवायचे नव्हते
मज तिला माझ्या
डोळ्यातील पाणी !
Chaan Kavita. Hridayateel ek khol ghusaleli aathavan distey Kavichya manateel....
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
हटवाBhari aahe sir ..Abhinandan
उत्तर द्याहटवाआभारी आहे !
उत्तर द्याहटवा